लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या दिवशी ११ एप्रिल २०१९ ला रामटेक लोकसभा क्षेत्राच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता मतदानाविषयी बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या. यात प्रामुख्याने जिवंत असलेल्या व्यक्तींना मृत दाखवून मतदार यादीत त्यांच्या नावासमोर (डिलेटेड) असे लिहिले होते. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या जवळ मतदार ओळखपत्र असून सुध्दा मतदानापासुन वंचित राहावे लागले, यात २२ व २३ वर्षाच्या तरुणांचाही समावेश होता हे विशेष. प्रशासनाच्या या चुकीमुळे बऱ्याच मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे मतदानापासुन वंचित राहिलेल्या लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष दिसून आला.वरील तक्रारीबद्दल योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये या वेळेस जिवंत असूनही मृत दाखवल्यामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना मतदार यादीत योग्य त्या दुरुस्ती करून मतदानापासुन वंचित ठेवू नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर सहकारी निवडणुक आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, राज्य नियुक्त आयुक्त मुंबई यांना केली आहे.
मृत दाखवून मतदानापासून ठेवले वंचित : अनिल देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:30 PM
जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
ठळक मुद्देचौकशी करण्याची मागणी