लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान येथे केलेल्या कारवाईत अवैधरीत्या देशीकट्टा बाळगणाऱ्या एका आराेपीस अटक केली. त्याच्याकडून लाेखंडी बनावटीचा १० हजार रुपये किमतीचा देशीकट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.१७) करण्यात आली.
राहुल नंदलाल प्रसाद (२०, रा. निरंकारी भवनसमाेर, कन्हान) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस पथक कन्हान पाेलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी आराेपीच्या घरी धाड टाकून घराची झडती घेतली. घराच्या हाॅलमधील साेफ्याखाली लपवून ठेवलेला लाेखंडी बनावटीचा देशीकट्टा आढळून आला. या अग्निशस्त्राबाबतचा परवाना वा कागदपत्रे नसल्याचे चाैकशीत निष्पन्न हाेताच, पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेत त्याच्याकडील १० हजार रुपये किमतीचा लाेखंडी हॅण्डमेट देशीकट्टा जप्त केला.
याप्रकरणी कन्हान पाेलीस ठाण्यात आराेपीविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, त्यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक अंबरते करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक अनिल राऊत, पाेलीस हवालदार विनाेद काळे, शैलेश यादव, भगत, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, सत्यशील काेठारे, भाऊराव खंडाते यांच्या पथकाने केली.