शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

देशमुख-बंग मतभेद मिटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:42 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना हात जोडत आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती केली.

ठळक मुद्देतटकरेंनी जोडले नेत्यांना हात : राष्ट्रवादीची शहर व जिल्हा आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना हात जोडत आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती केली. तुम्ही दोन्ही नेते माझे वरिष्ठ आहात. आपसात एकत्र बसा. वाद मिटवा. तुम्ही ठरवले तर जिल्ह्यात सर्व आमदार निवडून येऊ शकतात, तुमच्यात एवढी शक्ती आहे. मात्र, तुम्ही आपल्या मतदारसंघाबाहेर संघटना मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, अशी खंत व्यक्त करीत पक्षासाठी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन काम करा, असा सल्लाही दिला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी नागपुरात येत पक्ष संघटनेचा आढावा घेतला. शहर राष्ट्रवादीची बैठक गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात तर ग्रामीण जिल्हाची बैठक गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात झाली. यावेळी माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख, माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष रमेश बंग, महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आ. प्रकाश गजभिये, आ. जयदेव गायकवाड, प्रमोद साळुंखे, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर ग्रामीणच्या बैठकीत तटकरे चांगलेच मूडमध्ये होते. त्यांनी देशमुख- बंग या दोन्ही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे नेम साधला.स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, बैठकांना महिलांची उपस्थिती कमी आहे. महिला संघटनेत अध्यक्ष व कार्याध्यक्ष अशी दोन पदे दिली आहेत. तरीही महिलांची उपस्थिती कमी आहे, याकडे लक्ष वेधत प्रदेश महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली. बैैठकीला ईश्वर बाळबुधे, दिलीप पनकुले, अनिल अहिरकर, सतीश इटकेलवार, धीरुभाई पटेल, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, अविनाश गोतमारे, महादेवराव फुके, राजू राऊत, विलास झोडापे, शाम मंडपे आदी उपस्थित होते.अजित पवारांनी घेतली हजेरीग्रामीणच्या बैठकीत अजित पवार यांनी तालुकानिहाय हजेरी घेतली. काही सेलची उपस्थिती कमी होती. तालुक्यातून उपस्थिती कमी का, अशी विचारणा करीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे तालुकानिहाय सभा घेतली जाईल, असे सांगत तालुक्यात बूथनिहाय कमिटी स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यकर्त्यांसाठी पुढील महिन्यापासून प्रशिक्षण शिबिर घेतले जाईल. वर्षभरात सहा शिबिरे होतील व आपण स्वत: यासाठी उपस्थित राहू, असेही त्यांनी सांगितले.विदर्भात पाय रोवण्यासाठी धडपडराष्ट्रवादी काँग्रेसची विदर्भात पाय रोवण्यासाठी धडपड सुरू असल्याचे व नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असल्याचे नागपूर शहर व ग्रामीणच्या बैठकीत पहायला मिळाले. अजित पवार यांनी विदर्भात पक्ष संघटन वाढीसाठी यापुढे आपण स्वत: लक्ष देणार असल्याची हमी दिली. विदर्भात मोठी पोकळी आहे. संघटना वाढविण्यासाठी व जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नियमित बैठका, मेळावे, सभा घेऊ असेही पवार यांनी आश्वस्त केले.शहराच्या बैठकीत मतभेदशहरच्या बैठकीत कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी काही पदाधिकारी शहरच्या बैठकांना येत नाही, अशी तक्रार करीत कार्यकर्त्यांवर मरगळ आली असल्याचे सांगितले. महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांनी हा धागा धरून आपला रोष व्यक्त केला. नेत्यांकडून मार्गदर्शन होत नसून, संघटनात्मक जबाबदारी सोपविली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. ग्रामीणच्या व्यक्तीला शहराचा कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांच्या हाताखाली आम्ही काम कसे करायचे, असा प्रश्न करीत शहरातील व्यक्तीच्या हाती धुरा देण्याची मागणी पेठे यांनी केली. माजी नगरसेवक राजू नागुलवार यांनीही नाराजी व्यक्त केली.