शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नागपुरात देशमुख पिता-पुत्रासाठी ‘साखर’ ठरणार कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 8:48 PM

सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत.

ठळक मुद्देहेटीसुर्ला साखर कारखान्यावर ७३.५० कोटींची थकबाकीसाखर आयुक्तांचे वसुलीसाठी पत्ररणजित व आशिष देशमुख यांच्यासह संचालक मंडळाला जारी होणार नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत. संबंधित थकबाकी वसूल करण्यासाठी राज्याचे साखर आयुक्त यांनी विभागीय साखर संचालकांना पत्र पाठविले आहे. या आधारावर आता रणजित देशमुख, आशिष देशमुख यांच्यासह सर्व १९ संचालकांना नोटीस जारी होणार आहे.हेटीसुर्ला येथील साखर कारखान्याचे रणजित देशमुख हे अध्यक्ष होते. तर संचालक मंडळात त्यांच्या पत्नी रूपाताई देशमुख व पुत्र आ. आशिष देशमुख यांच्यासह एकूण १९ जणांचा समावेश होता. २००३-०४ मध्ये हा कारखाना बंद पडला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ४ मे २००७ रोजी या कारखान्याची १२ कोटी ९५ लाख रुपयांमध्ये विक्री केली. सद्यस्थितीत या साखर कारखान्याकडे कोणतीही मालमत्ता शिल्लक नाही. कारखान्याने २१.७२ कोटींचे कर्ज घेतले होते. त्यावर ५१.७८ कोटी रुपयांची व्याज आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम ७३ कोटी ५० लाखांवर पोहोचली आहे.आता ही रक्कम सक्तीने वसूल करण्यासाठी साखर आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. देशमुख यांच्यासह संचालक मंडळाकडून ही रक्कम वसूल करावी, असे पत्र साखर आयुक्तांनी विभागीय साखर संचालकांना पाठविले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आधारावर पुढील दोन दिवसात देशमुख यांच्यासह सर्व १९ संचालकांना नोटीस जारी होणार आहे. कर्जाच्या रकमेची मुदतीत परतफेड केली नाही तर संचालकांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संचालक मंडळावरही टांगती तलवार रणजित देशमुख यांची पत्नी रूपाताई व मुलगा डॉ. आ. आशिष यांच्यासह संचालक मंडळात कोमलचंद राऊत, धर्मेंद्र पालीवाल, अमोल शशिकांत देशमुख, अरुणराव घोंगे, सुरेश कुहिटे, अशोक धोटे, भाऊराव भोयर, शिशुपाल यादव, सूर्यकांत कुंभारे, प्रभुदयालसिंग रघुवंशी, राजेंद्रकुमार देशमुख, अ‍ॅड. लखनलाल सोनी, प्रमिलाताई महाजन, विवेक मोवाडे, विजय भजन, टी.पी. निकम यांचा समावेश होता. या सर्वांना कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.देशमुखांच्या संकटात वाढ आयडीबीआय बँकेच्या थकीत कर्जाच्या प्रकरणी रणजित देशमुख यांची मालमत्ता जप्त होण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लता मंगेशकर हॉस्पीटलला शैक्षणिक उपयोगासाठी दिलेल्या जमिनीचा व्यावसायीक वापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावन संबंधित जमीन शासनजमा का करू नये, अशी विचारणा केली. त्या पाठोपाठ आता हेटीसुर्ला साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत कर्जावरून देशमुख यांना पुन्हा एका नोटीसीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे देशमुख यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत.साखर कारखान्यावर असे आहे कर्जबाब                             कर्ज           व्याज               एकूणशासकीय भाग भांडवल १२.००         ००                १२.००शासकीय हमी वरील कर्जे ८.६१     ४९.८२           ५८.४३शासन हमी शुल्क           ०.३६       ०.११              ०.४७सॉफ्ट लोन                      ०.७५     १.८५             २.६०----------------------------------------------------------एकूण                            २१.७२     ५१. ७८         ७३.५०

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुखSugar factoryसाखर कारखाने