नागपूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेत रणजित देशमुख यांनी आपला मुलगा डॉ. अमोल याच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली मानसिक छळाची तक्रार मागे घेतली आहे. मध्यस्थीच्या यशस्वी शिष्टाईनंतर देशमुख पिता-पुत्रात समेट घडून आला आहे.माजी मंत्री रणजित देशमुख यांचे आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. अमोल देशमुख हे दोन पुत्र आहेत. डॉ.आशिष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बरकत’ या बंगल्यात स्वतंत्र राहतात. तर डॉ.अमोल हे रणजितबाबू यांच्या जीपीओ चौकातील घरात वास्तव्यास होते.देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. आपल्या मुलाने (डॉ. अमोल) घराचे कुलूप तोडून सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसºया मजल्यावर अवैधरीत्या कब्जा केला आहे. वारंवार सांगूनहीतो घर रिकामे करण्यास तयारनाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार देशमुख यांनी सोमवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली होती.या तक्रारीनंतर अमोल यांनी रणजितबाबू यांची भेट घेतली. त्यांचा गैरसमज दूर केला. तुम्ही माझे वडील आहात, तुमचे घर बळकावून मी काय साध्य करू, असे सांगत घर सोडण्याची तयारी दर्शविली व वेळ मागितला. याबाबत लोकमतशी बोलताना रणजितबाबू म्हणाले, हितचिंतकांनी मध्यस्थी केल्यानंतर आमच्यातील वाद क्षमला आहे. अमोलने आपले घर खाली करावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख पिता-पुत्रात समेट : रणजित देशमुखांनी मागे घेतली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:18 AM