नागपूर विद्यापीठ : कुलगुरूसाठी आज फायनल परीक्षा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपद निवडीच्या प्रक्रियेचा मंगळवारी अंतिम टप्पा पार पडणार आहे. शोध समितीसमोर सादरीकरण केलेल्या ‘टॉप ५’ उमेदवारांच्या राज्यपाल मुलाखती घेणार आहेत. राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सिद्धार्थ काणे व डॉ. संजय देशमुख या दोघांची नावे सर्वात वर असून, मंगळवारी सायंकाळी कुलगुरूंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘टॉप-५’मध्ये विदर्भातील २ उमेदवारांचा समावेश आहे.डॉ. विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर नागपूर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही जबाबदारी कोणाला मिळणार, याबाबत औत्सुक्य लागले होते. सुमारे १३७ अर्जांतून शोध समितीने १८ उमेदवारांना ४ व ६ एप्रिल रोजी वर्धा येथे सादरीकरणासाठी बोलविले. सोमवारी समितीने यातील ‘टॉप ५’ जणांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे सोपविली. यानंतर राज्यपाल कार्यालयाने तातडीने पावले उचलत मंगळवारीच या ५ उमेदवारांना मुलाखतीकरीता मुंबईला बोलविले आहे. गुणवत्तेला मिळणार प्राधान्यकुलगुरूपदाच्या निवडीत उमेदवारांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे राजभवनातील सूत्रांनी सांगितले. कुठलाही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप यात राहणार नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जे ५ उमेदवार मंगळवारी मुलाखतीला सामोरे जाणार आहेत, ते शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात नावाजलेले आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला दर्जेदार कुलगुरू मिळणार हे निश्चित.यांच्यामध्ये आहे स्पर्धा डॉ. संजय देशमुख, मुंबईडॉ. सिद्धार्थ काणे, नागपूरडॉ.डी.जी.गौतम, जळगावडॉ.महेंद्र कुमार राय, अमरावतीडॉ.पी.एम.खोडके, कराड
देशमुख की काणे ?
By admin | Published: April 07, 2015 2:06 AM