नागपूर : नागपूर शहरात ३२४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रोड उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. संबंधित सर्वेक्षणाच्या आधारावर व्हीएनआयटी सिमेंट रोडचे डिझाईन तयार करेल. यासाठी व्हीएनआयटीकडून महापालिकेला संमतीपत्र प्राप्त झाले आहे. शहरातील मुख्य मार्ग सिमेंट कॉँक्रिटचे केले जाणार आहेत. राज्य सरकार व नासुप्र या प्रकल्पासाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार असून उर्वरित रक्कम महापालिका खर्च करणार आहे. या प्रकल्पासाठी प्लेन टेबल सर्व्हे, मॅन्युअल ट्राफिक सर्व्हे, व्हिडिओग्राफी ट्राफिक सर्व्हे, सर्व्हे ड्रॉर्इंग आदी तयार करण्याचे काम मे. आकार अभिनव कन्सल्टंन्ट प्रा. लिमिटेड, नवी मुंबईला देण्यात आले आहे. तसेच मे. इमाजिस इंजीनियरिंग सोल्युशन्स प्रा. लिमिटेड व मे. कोरान्ने कन्सल्टंन्ट यांना जियोटेक्निकल सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे.
व्हीएनआयटी बनविणार सिमेंट रस्त्याचे डिझाईन
By admin | Published: October 17, 2015 3:08 AM