लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खºया अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे तसेच सत्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते. मात्र आता पदव्यांना ‘डिजिटल’ स्वरूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या ‘एनएडी’सोबत (नॅशनल एज्युकेशन डिपॉझिटरी) विद्यापीठाला ‘लिंक’ करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘एनएसडीएल’शी (नॅशलल सिक्युरिटी डिपॉझिटरी लि.) गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ‘लोकमत’ने वारंवार हा विषय लावून धरला होता हे विशेष.देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित रहावीत यासाठी केंद्र शासनाने ‘एनएडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या ‘ई-रिफॉर्म्स’च्या बºयाच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता सहा महिन्यांअगोदर यासंदर्भात विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाºयांमध्ये चर्चा झाली व विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे ‘डिजिटल’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. यासंदर्भात ‘एनएसडीएल’ व ‘सीडीएल’ या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती.त्यानुसार विद्यापीठाने ‘एनएसडीएल’शी सामंजस्य करार केला आहे. गुरुवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, ‘एनएसडीएल’चे सहायक महाव्यवस्थापक प्रशांत प्रचंड यांनी या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी उपस्थित होते.या करारान्वये ‘एनएसडीएल’ विद्यापीठास ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मोफत सेवा देणार आहे.विद्यार्थ्यांची पायपीट वाचणारया करारानुसार आता दीक्षांत समारंभात पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे डिजिटल करण्यात येतील. विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे जगातून कुठूनदेखील पाहता येतील. यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट वाचणार आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येईल. ३० सप्टेंबरपर्यंत मागील वर्षांच्या दीक्षांत समारंभाच्या सर्व पदव्या ‘आॅनलाईन’ उपलब्ध होतील. शिवाय मागील दहा वर्षातील पदव्याही टप्याटप्याने वेबसाईटवर सुरक्षितपणे उपलब्ध होतील.
पदव्यांनाही ‘डिजिटल’ स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:52 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खºया अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे तसेच सत्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते.
ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘एनएडी’सोबतच सामंजस्य करार