लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : घुबडी (ता. काटाेल) हे दुर्गम भागात वसलेले ३५० लाेकसंख्येचे आदिवासीबहुल गाव. या गावात सध्या काेराेनाचे ४४ रुग्ण आढळून आले असून, सुविधांअभावी संक्रमणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. यावरून काेराेनाचे संक्रमण दुसऱ्या टप्प्यात गावागावात पाेहाेचल्याचेही दिसून येते.
काेंढाळी (ता. काटाेल) पासून १५ किमीवर असलेल्या घुबडी गावात ९० आदिवासी बांधव राहतात. या गावात सध्या काेराेनाच्या ४४ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, या सर्वांनी त्यांच्या चाचण्या करवून घेतल्या आहेत. ही रुग्णसंख्या केवळ दाेन दिवसातील आहे. यावरून संक्रमणाचा वेग स्पष्ट हाेताे. गावातील बहुतांश नागरिकांची घरे छाेटी असल्याने तसेच अनेकांकडे स्वतंत्र खाेल्या नसल्याने ते एकत्रच राहतात. त्यामुळे काेराेना रुग्ण आधी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि नंतर घराबाहेर पडल्यास इतरांच्या संपर्कात येताे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने येथील नागरिकांना खासगी डाॅक्टर अथवा हाॅस्पिटलमध्ये उपचार करवून घेणे तसेच घरे छाेटी असल्याने गृह विलगीकरणात राहणे अनेकांना शक्य हाेत नाही. शिवाय, प्रशासनही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काेंढाळी व परिसरातील गावांमध्ये घराघरात सर्दी, पडसे, खाेकला, ताप, घशात खवखव हाेणे, ताेंडाला चव नसणे, नाकाला वास न येणे आदी लक्षणांचे रुग्ण आहेत. या नागरिकांना काेराेना टेस्ट करवून घेण्याबाबत डाॅक्टर वारंवार विनंती करीत असले तरी बहुतांश नागरिक टेस्ट करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील काेराेना संक्रमण हाताबाहेर जात असल्याने शासनाने आराेग्य सेवेत वाढ करून काही काळासाठी लाॅकडाऊन जाहीर करणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया काही सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.
...
रुग्णाचा दवाखान्यासमाेर मृत्यू
नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटल, मेयाे रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जागा नसल्याने दिघाेरी, नागपूर येथील ४६ वर्षीय काेराेनाबाधित रुग्णाला त्याच्या कुटुंबीयांना डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार अमरावती येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुटुंबीयांनी रुग्णासाेबत मंगळवारी (दि. १३) सकाळी नागपूरहून अमरावतीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केला. हा रुग्ण काेंढाळी परिसरात दाखल हाेताच त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्या रुग्णाने काेंढाळी येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या आवारात तडफडत अखेरचा श्वास घेतला.