लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोजगार निर्मितीसाठी बांबू क्षेत्राचा विकास महत्त्वाचा मानला जातो. जल, जंगल, जमीन व जनावर या विषयावर गहन चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी बांबू या विषयावर भर देऊन ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करण्याला प्राधान्य द्यायला हवे. त्याकरिता विज्ञानाचा आधार घेऊन ग्राम तथा शेती आधारित उद्योगाला चालना द्यायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.महाराष्ट्र बांबू मंडळ व बांबू सोसायटी आॅफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणवीस सेंटर येथे जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व महापौर नंदा जिचकार, सुनील जोशी हे उपस्थित होते. बांबूपासून बायो सिएनजी इथेनॉल निर्मिती करून पर्यावरणाला पोषक असे वातावरण निर्माण होईल. येत्या काही महिन्यात मासळ येथे सीएनजी प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. याकरिता एक हजार टन बांबू रोज खरेदी करण्याचा विचार आहे. गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी अगरबत्ती प्रकल्प उभारून ग्रामीण तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आर्किटेक्ट सुनील जोशी यांनी केले.
बांबू क्षेत्राचा विकास व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:28 AM
रोजगार निर्मितीसाठी बांबू क्षेत्राचा विकास महत्त्वाचा मानला जातो. जल, जंगल, जमीन व जनावर या विषयावर गहन चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी बांबू या विषयावर भर देऊन ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करण्याला प्राधान्य द्यायला हवे.
ठळक मुद्देनितीन गडकरी : जागतिक बांबू दिनानिमित्त कार्यक्रम