लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दृढता, दूरदृष्टी, जोखिम स्वीकारण्याची क्षमता आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ही उद्योजकांची काही वैशिष्ट्ये आहेत. उद्योगाच्या विकासासाठी युवकांमध्ये चिकाटी आणि चांगले गुण आवश्यक असल्याचे मत विको लेबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी येथे व्यक्त केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) महिला विंगचा पदग्रहण समारंभ सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात सोमवारी पार पडला. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, माजी अध्यक्ष व महिला विंगचे समन्वयक सुरेश अग्रवाल, सचिव डॉ. सुहास बुद्धे, नवनियुक्त अध्यक्ष रिता लांजेवार, कोषाध्यक्ष शिखा खरे आणि सचिव मनीष बावनकर, माजी अध्यक्ष साची मलिक उपस्थित होते.पेंढरकर म्हणाले, ग्राहकांना नवीन उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ७० वर्षांपूर्वी वडिलांनी कंपनीची स्थापना केली होती. विको टर्मरिक क्रीम आणि दात ब्रश करण्यासाठी विको पेस्ट निर्मितीची कल्पना त्यावेळी हास्यास्पद होती. पण त्यानंतरही वडिलांनी आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती केली. त्याचवेळी हाय फ्लोरिन घटकांमुळे अमेरिकेत दोन मोठ्या टूथपेस्टवर बंदी टाकण्यात आली होती. पण विको पेस्टने दुष्परिणाम होत नसल्याचे सिद्ध केले होते. वडिलांनी उत्पादनाच्या अस्तित्वासाठी सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एकट्याने लढा दिला होता. कारण आयुर्वेदिक उत्पादनांच्या लेबरलवर एआय नमूद करावे लागत होते. तर कॉस्मेटिक उत्पादनांसाठी बंधनकारक नव्हते.पेंढरकर म्हणाले, एका फे्रंच उद्योजकाने विको पेस्ट मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवली होते. तर न्यूझीलंड येथील एका ग्राहकाने या उत्पादनाची मागणी केली होती. ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादानंतर सध्या विकोची उत्पादने ४५ देशांमध्ये निर्यात केली जातात. ब्रॅण्डची विश्वासार्हता आणि ती विकसित करणे आवश्यक असते. युवकांनी नोकरीसाठी देश सोडून जाऊ नये. चांगल्या संकल्पनेने देशातच उद्योग उभारावा.व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षपदी रिता लांजेवारवर्ष २०१९-२० करिता व्हीआयए महिला विंग कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी रिता लांजेवार, सचिव मनीषा बावनकर, उपाध्यक्ष पूनम लाला, इंदू क्षीरसागर, कोषाध्यक्ष शिखा खरे, जनसंपर्क अधिकारी रश्मी कुळकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष साची मलिक, चित्रा पराते, वाय रमणी, नीलम बोवाडे, अंजली गुप्ता, अनिता राव, वंदना शर्मा, योगिता देशमुख आणि सल्लागार समितीमध्ये सरला कामदार, प्रफुल्लता रोडे, सरिता पवार, मधुबाला सिंग यांचा समावेश आहे.व्हीआयए महिला विंगच्या पदग्रहण समारंभात संजीव पेंढरकर, व्हीआयए अध्यक्ष सुरेश राठी, सुरेश अग्रवाल, नवनियुक्त अध्यक्ष रीता लांजेवार, सचिव मनीषा बावनकर आणि अन्य पदाधिकारी.
चांगल्या उद्योजकांचे गुण विकसित करा : संजीव पेंढरकर यांचे युवकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:49 AM
दृढता, दूरदृष्टी, जोखिम स्वीकारण्याची क्षमता आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ही उद्योजकांची काही वैशिष्ट्ये आहेत. उद्योगाच्या विकासासाठी युवकांमध्ये चिकाटी आणि चांगले गुण आवश्यक असल्याचे मत विको लेबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देव्हीआयए महिला विंगचा पदग्रहण सोहळा