शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरच्या संपूर्ण विकास : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 10:22 PM

नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देई-लायब्ररीसाठी पाच कोटी; आचारसंहितेपूर्वी प्रस्तावाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. विकासासाठी ३१.१५ कोटींचा निधी दिला असून राज्य सरकारच्या निधीतून गांधीसागरचा संपूर्ण विकास केला जाईल. तसेच नागपुरातील लालस्कूलच्या जागेवर अत्याधुनिक ई-लायब्ररी उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.गीतांजली चौक ते गांधीसागर मार्ग डी.पी. रोडचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थायी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-लायब्ररीला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पाठविण्याचे निर्देश महापालिकेला दिले. यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. नागपूर शहराने विकासाची क्रांती केली आहे. २१ व्या शतकातील आधुनिक शहर होत आहे. विकासाचा लाभ सर्वस्तरातील लोकांना होईल. लोकांना विश्वासात घेऊ न विकास केला जाईल. लोक म्हणायचे पश्चिम नागपूरचा विकास होत आहे. परंतु आता मध्य व पूर्व नागपूर विकासामुळे पूर्णपणे बदललेले बघयाला मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी प्रस्ताविकातून नवीन डी.पी.रोडसाठी १४ कोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. यातील ४.६२ कोटीतून १८ मीटरचा रस्ता तर ९ कोटींचा निधी पुनर्वसनावर खर्च केला जाणार आहे.एम्प्रेस मॉलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणार: नितीन गडकरीएम्पे्रस मॉलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारमेंट झोन उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला जाईल. यातून १० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.इंटिग्रेटेड गारमेंटची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर शहरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. गांधीसागर तलावाच्या विकासासाठी ३१ कोटी दिले. शहराच्या विकासासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारनेही निधी उपलब्ध केला. मध्य नागपुरातील अरुंद रस्त्यांमुळे त्रास होतो. याचा विचार करता मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड, केळीबाग रोड यासह सहा रस्त्यांची कामे होत आहेत. रस्त्यांमुळे बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. जमीन अधिग्रहणासाठी ४५० कोटींचा निधी दिल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGandhi Sagarगांधीसागर