लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. परंतु तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेला विकास कामासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. शहरातील सुरू असलेले व प्रस्तावित विकास प्रकल्प विचारात घेता महापालिकेला पुढील पाच ते सात वर्षात २०४७.४५ कोटींचा आर्थिक बोजा उचलावा लागणार आहे. यासाठी महापालिका २०० कोटींचे कर्ज घेणार आहे.कर्जासोबतच नागपूर शहराच्या सुधारित विकास आराखड्यानुसार अनधिकृत बांधकामे शुल्क आकारून नियमित करणे, मौजा गाडगा येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदी प्रस्तावांना मंजुरी घेण्यासाठी मंगळवारी महापालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. अचानक सभा आयोजित करण्यात आल्याने महापालिकेत उलटसुलट चर्चा आहे.महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी अर्थसंकल्प सादर करताना २०० कोटींचे कर्ज घेण्याची घोषणा केली होती. वास्तविक स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात कर्जाचा समावेश करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविता आला असता. परंतु स्थायी समितीच्या अर्थसंकल्पापूर्वी विशेष सभा आयोजित करून कर्जाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या डोक्यावर आधीचे ६०० कोटींचे कर्ज आहे. मात्र महापालिके च्या वित्त विभागातर्फे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात पुढील पाच ते सात वर्षात महापालिकेला विविध १२ योजनांवर २०४७.४५ कोटींची गरज भासणार आहे. यात स्मार्ट सिटीसाठी सर्वाधिक ६५८.७८ कोटींच्या निधीचा समावेश आहे.महापालिकेने पेंच टप्पा ४ साठी महाराष्ट्र बँकेकडून २०० कोटींचे कर्ज घेतले होते. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कर्जाची परतफेड होईल. यासोबत नवीन २०० कोटींचे कर्ज घेण्यात येईल. त्यामुळे महापालिकेवर कर्जाचा बोजा वाढणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.प्रकल्पाचे नाव व मनपाच्या दायित्वाचा प्रकार रक्कम (कोटीत)स्मार्ट सिटी (२६३५.११ कोटीत मनपाचा २५ टक्के वाटा ) ६५८.७८शहरातील सिमेंट रस्ते, टप्पा -१ व टप्पा -२ २००.००शहर परिवहन सेवा (तूट भरून काढणे) १०८.००अमृत योजनेच्या प्रकल्पात मनपाचा वाटा ११३.३५हुडकेश्वर-नरसाळा पाणीपुरवठा योजना व रस्ते २५ .००पथदिव्यांचे एलईडी दिव्यात रूपांतर करणे २७०.४८भांडेवाडी एसटीपी प्रकल्प १३०.००वेस्ट टू एनर्जी ९०.००घनकचरा व्यवस्थापनातील वाटा २११.७८मेट्रो रेल्वे प्रकल्पातील वाटा ७३.००नासुप्रला द्यावयाचे वैधानिक अशंदान ५२.७८झोपडपट्टी पुनर्वसनातील विविध कामे ११४.२८भविष्यात मनपावर येणारे एकूण वित्तीय दायित्व २०४७.४५