शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

नागपूरचा विकास हे बेरोजगारांना फसविण्याचे कुरण; हायकोर्टाचे परखड निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 11:06 AM

नागपूर शहराच्या विकासाने बेईमान लोकांसाठी बेरोजगारांना फसविणारे कुरण तयार करण्याचे मार्ग मोकळे केले आहेत, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले.

ठळक मुद्देआर्थिक फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या विकासाने बेईमान लोकांसाठी बेरोजगारांना फसविणारे कुरण तयार करण्याचे मार्ग मोकळे केले आहेत. हे बेईमान लोक नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची लाखो रुपयांनी फसवणूक करीत आहेत, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले.देशाच्या इतर शहरांप्रमाणे नागपुरातही बेरोजगारांची कमतरता नाही. ते रोजगार मिळविण्यासाठी सतत उत्सुक असतात. त्यातून अवैध आर्थिक मागण्या पूर्ण करण्याचीही त्यांची तयारी असते. पैसे दिल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही. तेव्हा ते पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. अशा गुन्ह्यांमध्ये नेहमीच व्हाईट कॉलर लोक सामील असतात. ते असे गुन्हे कधीच एकट्याने करीत नाहीत. सामूहिक यंत्रणा तयार करून बेरोजगारांना फसविले जाते. त्या यंत्रणेला समाजाद्वारे रॅकेट संबोधले जाते. हे रॅकेट शार्क माशाप्रमाणे कार्य करते. ते नोकरीच्या आमिषाला भुलून पैसे देण्याची तयारी असलेल्या बेरोजगारांना हेरून त्यांचा घास घेते, असे मत न्यायालयाने पुढे नोंदवले.नागपूर मेट्रो रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाला फसविणारी नंदनवन येथील आरोपी रंजना प्रभाकर आदमने (४०) हिने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदवून तिचा अर्ज फेटाळून लावला. यापूर्वी २० जुलै २०१९ रोजी सत्र न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २४ आॅक्टोबर २०१८ रोजी हुडकेश्वर पोलिसांनी आर्थिक फसवणूक झालेले चंद्रशेखर उकेश यांच्या तक्रारीवरून आदमनेसह इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४७३, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.बेरोजगारांची ८० लाखांनी फसवणूकसरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, या प्रकरणातील आरोपींनी बेरोजगार युवकांची सुमारे ८० लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. ते बेरोजगारांना १२ ते १५ लाख रुपये मागत होते. आरोपी प्रशांत हेडाऊ याच्या घरी सापडलेल्या डायरीत बेरोजगारांकडून घेतलेल्या रकमेच्या नोंदी आहेत. मुख्य आरोपी रवी सत्यकुमार फरार आहे. तो हैदराबाद येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे सर्व रक्कम आहे. न्यायालयात राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय