लोकमत इमपॅक्टलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.इंदूर स्वच्छतेच्या बाबतीत देशात नंबर वन होण्याची केलेली किमया नागपुरात का होत नाही. यासाठी ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाच्या चमूने थेट इंदूर शहरात जाऊन शहराने केलेल्या किमयेविषयी महापौर,आयुक्त व नागरिकांशी चर्चा केली. या शहराच्या स्वच्छता कार्याविषयीची मालिका प्रकाशित केली जात आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे एक पथक इंदूर दौºयावर पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी दिली.या पथकात स्थायी समितीचे पदाधिकारी व सदस्य, आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूरही स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन व्हावे, यामागील हेतू असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.कचरा उचलण्यासाठी १५ दिवसात निविदानागपूर शहरातील क चरा संकलन व वाहतूक करण्याची जबाबदारी मे. कनक रिसोर्सेस प्रा.लि. यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात असलेल्या नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता, कचरा उचलण्याचा कनक रिसोर्सेसचा कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदाराला हा कंत्राट दिला जाणार आहे. याबाबतच्या निविदा १५ दिवसात काढण्यात येतील, अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.वाढीव दर देण्याचा प्रस्ताव स्थगितमहापालिका प्रशासनाने २०१६ पासून कचरा उचलण्याचा प्रति टन १३०६.८५ रुपये दर ठरविला होता. नवीन निविदा प्रक्रिया होईपर्र्यंत हा दर कायम राहणार आहे. त्यानुसार होणाऱ्या फरकाची रक्कम देण्याला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थगित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला.
इंदूरच्या धर्तीवर नागपूरचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 1:32 AM
एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.
ठळक मुद्देमनपाचे पथक अभ्यास दौऱ्यावर जाणार : पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश