शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत

By admin | Published: September 10, 2016 2:17 AM

नागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)

विश्वराज समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे मतनागपूर शहराच्या समग्र विकासाबाबत ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन-२०२०’ (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ‘आॅरेंज सिटी वॉटर’चे (ओसीडब्ल्यू) सहकार्य लाभले आहे. या पार्श्वभूमीवर विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांची विशेष मुलाखत.नागपूर : सरकार कुणाचेही आले तरीही लोकसहभाग असलेली विकासाची कामे कधीही थांबत नाहीत. कोणत्याही भागात कामे सुरू करण्यापूर्वी मोहल्ला बैठक आवश्यक आहे. आम्हीसुद्धा कामे करताना जलमित्र निवडतो. ‘पीपीपी’ ऐवजी आता ‘पीपीपीपी’मधील चौथा ‘पी’ म्हणजे लोकसहभाग. त्या माध्यमातून कामे वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे विकासाची कामे लोकसहभागातून व्हावीत, असे मत विश्वराज समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.लखानी म्हणाले, २४ बाय ७ ही योजना यशस्वीरीत्या राबवित आहे. अन्य जिल्ह्यामध्ये ही योजना बंद पडली आहे. नागपुरात चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू आहे. त्याचा उपयोग नागरिकांना होणार आहे. यासाठी वर्धा रोडवर उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक बंद होईल. त्यासाठी त्या परिसरातील नागरिकांना याची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दूर होईल, असे लखानी म्हणाले.२४ बाय ७ योजना राबविण्यापूर्वी ‘माय सिटी माय वॉटर’ ही योजना नागपुरातील शाळांमध्ये राबविली. याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. जलसंवाद सुरू केला. नागरिकांशी संवाद साधून योजनेंतर्गत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविल्याही. आता २४ बाय ७ योजना यशस्वीरीत्या सुरू असून नागपूर कार्यक्षेत्र असल्याचे लखानी म्हणाले. संस्कृती आणि आर्टवर बोलताना लखानी म्हणाले, देशपांडे आणि धनवटे सभागृह सोडल्यास नागपुरात चांगले सभागृह नाही. नवीन सभागृहांची निर्मिती व्हावी. नागनदी स्वच्छतेवर ते म्हणाले, यावर्षीच्या पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचले नाही. याचे मुख्य कारण हे की, पावसाळ्यापूर्वी नागनदी स्वच्छ केली. शहरात बगिच्यांची चांगली देखरेख होत असल्याचे त्यांनी सांगितले. झोपडपट्टी विकासावर लखानी म्हणाले, झोपडपट्टीमध्ये अनेक अडचणी आहेत. सरकारने प्रयत्न केले पाहिजे. कारण ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. त्यांच्या अडचणी संवादाद्वारे सोडविल्या जाऊ शकतात. आपल्याकडे एखादा प्रकल्प पूर्ण व्हायला तीन ते चार वर्ष लागतात. प्रकल्प युजर फ्रेंडली कसा होईल, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित व्हावी, असे लखानी यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कामासाठी मनपा आणि नासुप्रने विशेष सेल स्थापन करावा, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)