"आमचा चांगला फोटो काढा रे..."; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 23:24 IST2023-12-07T23:22:55+5:302023-12-07T23:24:29+5:30
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी विधानसभेतील आरोप प्रत्यारोपानंतर नेत्यांच्या मैत्रीचे दर्शनही घडून आले.

"आमचा चांगला फोटो काढा रे..."; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून खडाजंगी बघायला मिळाली. यानंतर मात्र, सायंकाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी विधानसभेतील आरोप प्रत्यारोपानंतर नेत्यांच्या मैत्रीचे दर्शनही घडून आले.
"ए आमचा एक फोटो चांगला काढा..." -
या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी तेथे लोकमत समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा देखील उपस्थित आहेत. यावेळी, देवेंद्र फडणवीस कॅमेरामनला, "ए आमचा एक फोटो चांगला काढा," असे म्हणताना दिसत आहेत.
"बघा मॅडम तुम्हालाच डिमांड आहे आम्ही काही नाही..." -
यावेळी आणखी एक प्रसंग घढला. या स्नेह भोजन कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार वर्षा गायकवाडही सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांचा ग्रूप व्हिडिओ घेताना, एक कॅमेरामन म्हणाला मॅडम आपला सिंगल फोटो घ्यायचा आहे. यावर, "बघा मॅडम तुम्हालाच डिमांड आहे आम्ही काही नाही," असे म्हणत नार्वेकर यांनी वर्षा गायकवाड यांनी गंमत केली आणि सर्वत्र एकच हशा पिकला.