शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

देवेंद्र फडणवीसांनी पाहिला 'द केरळ स्टोरी'; म्हणाले, सडक्या मेंदूतील सडक्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 8:32 AM

धर्मांतरण व लव्हजिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजन करण्यात आले होते

नागपूर - द काश्मीर फाईल्सनंतर आता ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून देशातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही जण या चित्रपटाचे समर्थन करत असून, काही जण या चित्रपटाविरोधात सूर आळवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील नेते मंडळींकडूनही चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात रात्री ९च्या सुमारास हा चित्रपट पाहिला. या चित्रपटावरून राजकारण तापले असताना फडणवीस यांनी चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जबरी टीका केली. 

धर्मांतरण व लव्ह-जिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे भाजप कार्यकर्त्यांसाठी नागपुरात आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप महिला कार्यकर्त्यांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या माध्यमातून कटू सत्य जनतेसमोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्या असं म्हणणाऱ्यांच्या सडक्या मेंदूतील सडक्या विचारांनाच फाशी देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. हा चित्रपट केवळ स्टोरी सांगण्यासाठी नसून जागृत करण्यासाठीच असल्याचंही त्यांनी म्हटलं. 

मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या देशातील विदारक सत्य समोर आणण्यात आले आहे. आपला देश पोखरण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. महिला व तरुणींची दिशाभूल करत त्यांना षडयंत्रात ओढले जात आहे. या गोष्टी समोर आल्या पाहिजे. या चित्रपटामुळे देशात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे डोळे उघडत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते आव्हाड

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करून इसिस संघटनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरcinemaसिनेमाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड