शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

खुनासंदर्भातील याचिकेत देवेंद्र फडणवीस यांचा मध्यस्थी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:07 AM

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित सोनेगाव येथील एका खुनासंदर्भातील याचिकेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व वर्तमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सदर याचिका वाईट उद्देशाने दाखल करण्यात आली आहे. याचिकेत आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत असे फडणवीस यांनी अर्जात म्हटले आहे. तसेच, आवश्यक बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी याचिकेत प्रतिवादी करून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

संबंधित याचिका अ‍ॅड. सतीश उके यांनी दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने गेल्या ६ मे रोजी राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. १२ जून २०१४ रोजी सोनेगाव परिसरात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सोनेगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी कायद्यानुसार तपास केला नाही, असा उके यांचा आरोप आहे. संबंधित मृतदेह एका उत्तर भारतीय मुलीचा होता. २०१२ मध्ये आरोपींनी त्या मुलीला चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. त्यानंतर एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. त्याविषयी बाहेर वाच्यता होऊ नये याकरिता त्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्यासाठी सोनेगाव परिसरातील गटारात टाकण्यात आला असे उके यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उके यांनी १३ मार्च २०२० रोजी पोलीस आयुक्तांना आणि ६ नोव्हेंबर २०२० रोजी गृहमंत्र्यांना निवेदन सादर करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या निवेदनामध्ये फडणवीस यांच्या दबावामुळे आरोपींना वाचवण्यात आले, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ते निवेदन याचिकेला जोडण्यात आले आहे.