‘देवगिरी’ उपमुख्यमंत्र्यांसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:52 AM2019-12-09T03:52:34+5:302019-12-09T06:05:20+5:30
उपराजधानीत १६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
नागपूर : उपराजधानीत १६ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून अधिवेशनाच्या कामाची तयारी जोमात सुरू आहे. नागपुरातील रामगिरी व देवगिरी या शासकीय निवासस्थानाचे खास महत्त्व आहे. रामगिरी हा राज्याचे मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान आहे, तर देवगिरी हा बंगला उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे.
नव्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद राहणार असल्याने देवगिरी बंगला सज्ज झालाय. परंतु यात कोण राहणार, याची उत्सुकता मात्र कायम आहे. देवगिरी बंगल्याची रंगरंगोटी व इतर आवश्यक कामे पूर्ण झालेली आहे.
मुंबई विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी नागपुरात डेरेदाखल झाले असून, विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी विधानभवनाची सुरक्षा व्यवस्था आपल्या ताब्यात घेतली असून, सोमवारपासून सचिवालयाचे कामकाजही सुरू होणार आहे.