नागपूर : चैत्र नवरात्रीचे समापन बुधवारी घट विसर्जनासोबत झाले. तर प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंदिरांमध्ये पुजारी व संस्थेच्या विश्वस्तांची उपस्थिती होती. दुपारी १२ वाजता महाआरती झाली. ऑनलाईन दर्शनाचा लाभ भाविकांना घेता आला. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात भाविकांना प्रवेशास निर्बंध घातले होते. अनेक भक्तांनी मंदिराच्या प्रवेशद्वारालाच नमस्कार केला. मंदिरात सकाळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक व पूजन झाले. दुपारी १२ वाजता जन्मोत्सवानिमित्त महाआरती करण्यात आली. रामनगरातील राम मंदिरातही रामजन्मोत्सव दुपारी २ ते ४ दरम्यान मंदिरातील पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी दुपारी १२ वाजता घरीच रामजन्म उत्सव साजरा केला. कोरोना महामारीच्या निवारणासाठी रामरक्षा पठण करण्यात आले.
प्रभू श्रीरामाच्या भक्तीत लीन झाले भक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:08 AM