लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅन्ड ह्युमन रिसोर्सेसच्या प्रयत्नांनी व वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (डब्ल्यूसीएल) यांच्या आर्थिक सहकार्याने मोफत वाटप करण्यात आलेल्या साहित्य-साधनांमुळे दिव्यांगांच्या नवजीवनाला सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.महाल येथील गडकरी वाड्यावर आयोजित जननी सेहत अभियानांतर्गत दोन विंगर व्हॅनचे लोकार्पण व दिव्यांगांना अवयव वितरण कार्यक्रमात गडकरी बोलत होते. व्यासपीठावर लार्सन अॅन्ड टुब्रो लिमिटेड(एल.अॅन्ड टी.)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज शिणॉय, सहायक व्यवस्थापक रिचा पंत व पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. वीरल कामदार आदी उपस्थित होते. जननी सेहत अभियानाच्या माध्यमातून १२० शिबिरात १८,०६७ महिलांची तपासणी करण्यात आली.यात कॅन्सरग्रस्त ५८ महिला आढळून आल्या. पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅन्ड ह्युमन रिसोर्सेसच्या माध्यमातून १६ सप्टेंबरपर्यंत १,२२० शिबिरांच्या माध्यमातून ५,६४,४१९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ७१,८८० मोतीबिंंदू शस्त्रक्रिया करून चष्मे वाटप करण्यात आले. २३,६९२ शस्त्रक्रिया, २४,०१४ ईसीजी, ९१,९५६ मधुमेह रुग्ण, हिमोग्लोबीनच्या ५४,९९१ रुणांवर उपचार करण्यात आले तसेच २,६६७ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.उत्तर नागपूरसह भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर आदी जिल्ह्यात थॅलेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना उपचाराची गरज आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ७५० एकल विद्यालये सुरू आहेत. या माध्यमातून या जिल्ह्यातील आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा मनोदय गडकरी यांनी व्यक्त केला.पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व गडकरी यांच्या प्रेरणेतून वंचितांना सेवा देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. काम मोठे आहे. नागपूरसह महाराष्ट्रातील कोणताही दिव्यांग उपक रणापासून वंचित राहू नये, असा संस्थेचा मानस असल्याचे वीरल कामदार यांनी सांगितले. प्रारंभी एलअॅॅन्डटीतर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या दोन विंगर व्हॅनचे लोकार्पण व १७ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन डॉ. मीनल सांगोळे यांनी तर आभार चारुदत्त बोखारे यांनी मानले.
साहित्य-साधनांमुळे दिव्यांगांना नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:23 AM
पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च अॅन्ड ह्युमन रिसोर्सेसच्या प्रयत्नांनी व वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड (डब्ल्यूसीएल) यांच्या आर्थिक सहकार्याने मोफत वाटप करण्यात आलेल्या...
ठळक मुद्देनितीन गडकरी : विंगर व्हॅनचे लोकार्पण व दिव्यांगांना अवयव वितरण