नागपूर : भारतातील बौद्ध धम्म श्रीलंकेद्वारा थायलंडमध्ये पोहोचला. भारतात संपवलेला धम्म थायलंडमधील नागरिकांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजविला. तो आदर्श आपण घ्यावा. थायलंड देशाचे पर्यटन आपण केले पाहिजे. त्यातून श्रद्धा मजबूत होतील, असे प्रतिपादन पत्रकार व नाटककार प्रभाकर दुपारे यांनी व्यक्त केले.
बुद्धविहार समन्वय समितीद्वारा उरुवेला कॉलनी येथील आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित यादवराव रंगारी स्मृती लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘मी पाहिलेला थायलंडचा बुद्ध धम्म’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी अशोक सरस्वती, बबन चहांदे, पी. एस. खोब्रागडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भन्ते कुशल धम्म संथरो, मायाताई रंगारी प्रामुख्याने उपस्थित हाेते.
प्रास्ताविक प्रा. घनश्याम धाबर्डे यांनी केले. संचालन तनुजा झिलपे यांनी केले. तर यशवंत वासनिक यांनी आभार मानले.