कळमेश्वर : भारतीय बाैद्ध महासभा, कळमेश्वर तालुका शाखेच्या वतीने कळमेश्वर शहरातील त्रिरत्न बुद्ध हारात नुकतेच धम्म संस्कार कार्यकर्ता शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी संघटित हाेऊन लढा देण्यासा निर्धार करण्यात आला.
दशरथ शंभरकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाराेहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी अरुण वाहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम इंगळे, देवानंद वानखेडे, विकास उंदीरवाडे, गंगाधर कांबळे उपस्थित हाेते. तुकाराम इंगळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा हेतू स्पष्ट केला. अरुण वाहणे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करीत संघटित हाेऊन लढा देण्याचे आवाहन केले. विकार उंदीरवाडे यांनी संस्थेचे आचारसंहिता, पदाधिकारी, त्यांची जबाबदारी, कार्यालय कारभार, लेखा व कार्यपद्धती समजावून सांगितली. देवानंद वानखेडे यांनी प्रशिक्षण व गंगाधर कांबळे यांनी संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. संचालन राहुल वानखेडे यांनी केले तर प्रभू कऱ्हाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला दादाराव शिरसाठ, राहुल पकिड्डे, हरीश शिरसाठ, सिद्धार्थ पाटील, विजय कापसे, कमल सोनटक्के, हर्षद तामगाडगे, हेमराज वासनिक, शशीकला चनकापुरे, अपर्णा लांजेवार, लता वानखेडे, कविता तोतडे, लता खडसे, संजय खांडेकर, सुनीता सोमकुवर, राजकन्या पाटील, रुचिक उके, बेबी बन्सोड, भारत भोंगाडे, माधुरी ठमके, परसराम तभाने यांच्यांसह नागरिक उपस्थित हाेते.