लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १३२ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. वेतन पथक अधीक्षक आणि लिपिकाच्या दुर्लक्षामुळे शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षकांचे वेतन नियमानुसार १ तारखेला झाले पाहिजे, या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ज्या लिपिकाच्या व अधीक्षकाच्या दिरंगाईमुळे बिल उशिरा गेले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी संघटनेतर्फे करण्यात आली. आंदोलनात संघटनेचे प्रमोद रेवतकर, अनिल गोतमारे, विठ्ठल जुनघरे, अविनाश बढे, तेजराज राजुरकर , विनय नंदनवार, ज्ञानेश्वर वाघ, श्रीकांत खोब्रागडे, विजय पेटकर, वामन सोमकुवर, मुकुंद चहांदे, दिलीप बोके आदी उपस्थित होते.
नागपुरात वेतनासाठी शिक्षकांचे उपसंचालक कार्यालयापुढे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:39 PM