नागपूर : शेतकरी आत्महत्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, ओबीसी जनगणना, बेरोजगार आदींच्या प्रश्नावर नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी ६ ते ११ जून दरम्यान विदर्भात कार्यकर्ता संवाद यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ तेली समाज महासंघाचे संघटक प्रा. रमेश पिसे, केंद्रीय सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेव हटवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महासंघ एक दबावगट म्हणून कार्य करीत असून महासंघाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. शेतकरी, शेतमजुर व सामान्य नागरिक संघटनेचे सभासद असल्याचे त्यांनी सांगितले. संवाद यात्रेत शिक्षणाचे बाजारीकरण, वाईट प्रथा बंद करणे, सामुहिक विवाह पद्धतीला चालना देणे आदीवर जनजागृती करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला रघुनाथ शेंडे, संजय शेंडे, कृष्णा बेले, संजय नरखेडकर आदी उपस्थित होते.