मुंबई - लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्यात मुंबई आणि उपनगरात 29 एप्रिल रोजी मतदान झाले. यावेळी बॉलिवूडच्या अनेक सेलीब्रेटिंनी मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणाऱ्या सिनेअभिनेता अक्षय कुमारने मतदान केले का? अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंर, पत्रकारांनी अक्षय कुमारला याबाबत प्रश्न विचारला असता, अक्षयने उत्तर देण्याचं टाळलं.
अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतली होती. अक्षयने घेतलेली मुलाखत अराजकीय असली तरीही त्यावर राजकीय प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. सोशल मिडियावर अक्षयने घेतेलेल्या मुलाखतीच्या पोस्ट फिरत असल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर, सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी अक्षय कुमार कुठेही मतदान करताना दिसला नाहीत. अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही असा दावा सोशल मिडियावर होतांना दिसत आहे. मोदींची मुलाखत घेणारे अक्षय मतदान केले का ? असे प्रश्न सोशल मिडीयावर विचारले जात आहे.
त्याअनुशंगानेच अक्षयला एक मॉलच्या बाहेर मतदानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अक्षयला राग आल्याचे दिसून आले, तसेच 'चलिए आइए चलिए' असे म्हणत अक्षयकुमारने पळ काढल्याचे दिसून आले. अक्षयने संबंधित पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेऊन चला या चला.. म्हणजे जाऊ द्या निघा... असेच म्हटल्याचे दिसून येते.
पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीनंतर अक्षय प्रचंड चर्चेत आला होता. या मुलाखतीत देश हिताच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाल्याचे पहायला मिळाले होते. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अक्षय कुमार यांनी मतदान केले की नाही याबाबत उलटसुलट चर्चा होतांना दिसत आहे. अक्षय कुमारला ट्विट करून अनेकजण मतदान केला का, असाही प्रश्न विचारताना पहायला मिळत आहे.