शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

डिझेल संपले बस थांबली

By admin | Published: September 15, 2015 6:12 AM

शहरातील स्टार बस सेवेबाबत नेहमीच आरडाओरड सुरू असते. यात स्टार बसचा आणखी एक प्रताप उघडकीस आला

नागपूर : शहरातील स्टार बस सेवेबाबत नेहमीच आरडाओरड सुरू असते. यात स्टार बसचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. डिझेल संपल्याने, स्टार बस रस्त्यातच बंद पडली. इंदोरा येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक व्यवस्था तर खोळंबलीच परंतु प्रवासी व विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता एमएच-३४ सीए -६२२३ या क्रमांकाची सीताबर्डी ते नारी ही स्टार बस प्रवाशांना घेऊन निघाली. सायंकाळची वेळ असल्याने या बसमध्ये नोकरवर्ग, कामगार, विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. ते सर्व घराकडे परत निघाले होते. दरम्यान सायंकाळी ६ वाजता इंदोरा चौकात बस बंद पडली. बराच प्रयत्न करूनही बस सुरू होत नसल्यामुळे प्रवाशांनी विचारणा केली परंतु काहीच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दरम्यान चौकातच बस उभी झाल्याने वाहतूकही खोळंबली. बस बिघडली असेल म्हणून प्रवासी विद्यार्थ्यांनी खाली उतरवून बसला धक्का मारण्याचाही प्रयत्न केला. परंतु तरीही बस सुरू झाली नाही. अखेर डिझेल संपल्याचे चालकाने सांगितले. चालक व कंडक्टरने डिझेलसाठी धावपळ केली. यात अर्धा तास निघून गेला. अर्ध्या तासाने डिझेल आणून बसमध्ये टाकण्यात आले आणि बस सुरू झाली. परंतु या वेळात इंदोरा चौकात बघ्याची चांगलीच गर्दी झाली होती. वाहतूकही खोळबंली होती आणि घरी जाण्याच्या घाईत असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. (प्रतिनिधी)ही गंभीर बाब आहेस्टार बस ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याचे काम करते. त्यामुळे त्यांच्या बसेस या ग्राहकांच्या सोयीनुसार चांगल्या असायलाच हव्या. स्टार बसेस लोकांच्या बसण्यासारख्या राहिल्या नाहीतच. परंतु आता वाहनात डिझेलही व्यवस्थित भरले जाते किंवा नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. डिझेल संपणार असल्याची माहिती चालकाला नव्हती का? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा साधा विषय नाही. महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे बाळू घरडे यांनी केली आहे.