धीरज शुक्ला।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माल वाहतूकदारांच्या संपामुळे शहरातील जड वाहनांची वर्दळ मंदावल्याने टोल वसुलीच्या नुकसानीसोबतच महामार्गावरील पेट्रोल पंपावरील डिझेलची विक्री ६० टक्के घटली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांचे वितरक अचडणीत आले आहेत. बुधवारी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बॅनरखाली शहर व परिसरातील डीलर्सनी या संपाला पाठिंबा दर्शविला. पेट्रोलची वाहतूक करणारे सुमारे ४०० टँकर उभे ठेवण्यात आले होते.नागपूर शहर व परिसरात सुमारे २४० पेट्रोल पंप आहेत. यात नागपुरातील ८५ पंपांचा समावेश आहे. शहरातील पेट्रोल पंपावर ३ टक्के व्हॅट आकारला जात असल्याने ट्रक चालक महामार्गावरील पेट्रोल पंपावर डिझेल भरतात. त्यामुळे महामार्गावरील सुमारे १२० पेट्रोल पंपावर सर्वाधिक डिझेलची विक्री होते. माल वाहतूकदारांच्या संपामुळे महामार्गावरील पेट्रोल पंपावर शुकशुकाट आहे. तुरळक वाहने डिझेल भरत असल्याने विक्री ४० टक्क्यांवर आली आहे. संप कायम राहील तर डिझेलपासून मिळणाऱ्या कर स्वरूपातील उत्पन्नावर परिणाम होऊन शासनाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडणार आहे. वाहतूकदार सरकारच्या आश्वासनावर संप मागे घेण्याच्या विचारात नाही. केंद्रीय संघटनांनीही शासनाने ठोस निर्णय जाहीर केल्याशिवाय संप मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या बॅनरखाली नागपूरच्या पंप चालकांनी वाहतूकदारांच्या संपाला एक दिवसाचा पाठिंबा दिला. बुधवारी शहरात सुमारे ४०० टँकर उभे होते. कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला नाही.- अमित गुप्ता, अध्यक्ष, विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनवाहतूकदारांचा संप गेल्या सहा दिवसापासून सुरू आहे. भंडारा मार्गावर अनेक ट्रान्सपोर्टर्सने या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. एनव्हीसीसीने आमच्या संपाला पाठिंबा दिला आहे. यामुळे शहरात आज १५० कोटीहून अधिक नुकसान झाले. न्याय्य मागण्या असूनही सरकारची भूमिका उदासीन आहे. सरकारतर्फे वाहतूकदारांशी चर्चा करण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतलेला नाही.- कुक्कू मारवाह, अध्यक्ष,नागपूर ट्रकर्स युनिटी