शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

नागपूर रेल्वेस्थानकासमोरील टेकडी फ्लायओव्हर  ४५ महिन्यांनंतरही तोडण्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 8:45 AM

Nagpur News ४५ महिन्यांनंतरही गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडण्यासाठी नागपूर महापालिकेला यश आले नाही. या उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांपैकी ८० दुकानदारांनी सहमती दर्शविली आहे. तर उर्वरित न्यायालयात केले आहे.

ठळक मुद्दे८० दुकानदारांनी दाखविली सहमती ३५ दुकानदारांचा प्रतिसाद नाही, २९ गेले न्यायालयात

राजीव सिंह

नागपूर : ४५ महिन्यांनंतरही गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडण्यासाठी नागपूर महापालिकेला यश आले नाही. या उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांपैकी ८० दुकानदारांनी सहमती दर्शविली आहे. तर उर्वरित न्यायालयात केले आहे. तर काहींनी मनपाच्या नोटिशीला उत्तर दिले नाही. हा उड्डाणपूल तोडून ६ लेनचा रस्ता बनणार होतो; पण दुकानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला कधी सुरुवात होईल यासंदर्भात मनपाचे अधिकारी कुठलीही डेडलाइन देण्यापासून वाचत आहे. विशेष म्हणजे प्रकल्पासाठी निधीची कुठलीही कमतरता नाही.

२९ सप्टेंबर २०१८ ला मनपाच्या सभेत गणेश टेकडी फ्लायओव्हर तोडून ६ लेनचा रस्ता बनविण्याचा निर्णय झाला होता. फ्लायओव्हरच्या खाली व्यवसाय करणाऱ्या १६० दुकानदारांना एमपी बसस्टॅण्ड परिसरात दुकान उपलब्ध करून देण्याचा पर्याय दिला होता. दुकान न घेणाऱ्यांना त्यांची अग्रीम रक्कम ८ टक्के व्याजासह परत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनपा बाजार विभागातर्फे काही दिवसांपूर्वी ड्रॉ काढून ५१ दुकानदारांना पर्यायी जागावर दुकान आवंटित करण्यात आले होते. तर २९ दुकानदार व्याजासह रक्कम घेण्यात तायर झाले होते. यातील १० दुकानदारांना अग्रीम रकमेचा चेक आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला होता. उर्वरित दुकानदारांची प्रक्रिया सुरू आहे.

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ दुकानदारांनी मनपाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात तर १२ दुकानदारांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केले. तर ३५ दुकानदार सुनावणीसाठी हजर झाले; पण त्यांनी मनपाच्या नोटिशीला उत्तर दिले नाही. उर्वरित १४ दुकानदारांशी मनपाची चर्चा सुरू आहे. दुकानदारांकडून जागा खाली करण्यास विलंब होत असल्याने पूल तोडून ६ लेनचा रस्ता बनविण्यास बराच कालावधी लागू शकतो.

- सीआरएफ फंडातून मिळाले २३४.२१ कोटी

जयस्तंभ चौक ते मानस चौक व जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स रस्त्यावरील वाहतुकीची समस्या निवारण्यासाठी रामझुला ते एलआयसी चौक व रिझर्व्ह बँकेपर्यंत फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. मात्र, रामझुलापासून लोहापूलदरम्यानचे ६ लेनच्या रस्त्याचे काम रखडले आहे. संबंधित प्रकल्पासाठी राष्ट्रीय सडक निधी (सीआरएफ) कडून २३४.२१ कोटी रुपये मिळाले आहे. महामेट्रो या प्रोजेक्टचे काम करीत आहे.

दुकानदारांना समाधानी करण्याचा प्रयत्न

मनपा उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की फ्लायओव्हरच्या जागी रस्ता बनविण्याच्या पूर्वी दुकानदारांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमानुसार दुकान अथवा अग्रीम रक्कम परत केली जात आहे. सर्वच दुकानदारांना समाधानी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाचेही नुकसान होऊ देणार नाही.

- दृष्टिक्षेपात

- ८१२ मीटर लांब व १०.५ मीटर रुंद या फ्लायओव्हरच्या बांधकामावर नागपूर महापालिकेने १६.२३ कोटी रुपये खर्च केले होते.

- रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागात २००८ मध्ये हा उड्डाण पूल तयार झाला होता. १७५ दुकाने व सुलभ शौचालय बनविण्यात आले होते. १६० दुकान ३० वर्षांसाठी लीजवर देण्यात आले होते.

- दुकानदारांकडून ११.९६ कोटी रुपयांची रक्कम अग्रीमच्या रूपात जमा करण्यात आली होती.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका