लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ‘दीक्षाभूमी’ तसेच ‘ड्रॅगन पॅलेस’ येथ १८ आॅक्टोबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपायुक्त संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, पोलीस उपायुक्त हर्ष पोतदार, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे लाखो अनुयायी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, २४ तास वीजपुरवठा, भाविकांसाठी बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डिंग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा विविध सुविधा येथे संबंधित विभागांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी केली ‘ड्रॅगन पॅलेस’ची पाहणी दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे येणाऱ्या लोकांना प्रशासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधांसंदर्भात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख अॅड. सुलेखा कुंभारे यांच्यासोबत चर्चा केली. परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, रस्ते दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था, पार्किंग तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. विविध बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी ड्रॅगन पॅलेससह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, विपश्यना मेडिटेशन सेंटरचीही पाहणी केली.या बैठकीत उपायुक्त संजय धिवरे, उपविभागीय अधिकारी वंदना चौरंगपत्ते, तहसीलदार टेळे, पोलीस निरीक्षक ढेरे, एस.टी. महामंडळाचे पदाधिकारी वरठी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दीक्षाभूमी-ड्रॅगन पॅलेससाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:16 PM
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ‘दीक्षाभूमी’ तसेच ‘ड्रॅगन पॅलेस’ येथ १८ आॅक्टोबर रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी सुरू : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला कामांचा आढावा