लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आॅक्टोबर असल्याने दीक्षाभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होईल.धम्मदीक्षा सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी सांगितले की, दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा यंदा चार दिवसांचा राहणार आहे. सोमवार १५ आॅक्टोबरपासून महिला परिषदेने या सोहळ्याची सुरुवात होईल. ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावरील ही परिषद असून डॉ. कमल गवई या अध्यक्षस्थानी राहतील. रेखा खोब्रागडे उद्घाटक राहतील. १६ आॅक्टोबरपासून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते धम्मदीक्षेच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. १७ तारखेला दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्यांचे ध्वजारोहण होईल. त्याच दिवशी सायंकाळी धम्म परिषद होईल. या परिषदेला जगभरातील बौद्ध भंते आणि विचारवंत सहभागी होतील. रात्री अश्वघोष आर्ट अॅण्ड कल्चर फाऊंडेशन कोल्हापूरतर्फे ‘संविधान जागर’ हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.पत्रपरिषदेला स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांच्यासह कैलास वारके, शरद मेश्राम, गणेश तांबे, देवाजी रंगारी, मधुकर मेश्राम आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, आठवले प्रमुख अतिथी१८ आॅक्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजता दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबंधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे राहतील.
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज : गुरुवारी मुख्य सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:03 PM
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आॅक्टोबर असल्याने दीक्षाभूमीवर अनुयायांची मोठी गर्दी होईल.
ठळक मुद्देअनुयायी दाखल, आज होणार गर्दी