शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

दीक्षाभूमी :पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:59 AM

सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.

ठळक मुद्देउत्तर भारत, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथील नागरिकांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने भदंत सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजारावर लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दोन हजार तर दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग होता. भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भन्ते नागघोष, भन्ते नागसेन, भन्ते धम्मप्रकाश, भन्ते नागधम्म यांनी अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महा राष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील अनुयायांचा समावेश होता. बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांकडून धर्मांतरण करण्याबाबत एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. यात त्याचे नाव, गाव पत्ता, कोणता धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे, याबाबतची माहिती आहे. दीक्षार्थीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याकडे स्मारक समितीचे विलास गजघाटे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी