लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नियोजित नागपूर दौरा प्रशासनाकडे अजूनही अधिकृतपणे आलेला नाही. तरी अधिकाºयांना मिळालेल्या निर्देशांनुसार राष्ट्रपती हे २२ सप्टेंबर रोजी एकदिवसाच्या नागपूर दौºयावर येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे २२ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. विमानतळावरून ते थेट दीक्षाभूमीला जातील. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना अभिवादन करतील. पाच ते दहा मिनिटे ते येथे घालवतील. त्यानंतर ते थेट हेलिकॉप्टरने कामठीला रवाना होतील. ११.३५ ला ते कामठीला पोहोचतील. ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करतील. यावेळी ड्रॅगन पॅलेसमध्ये विशेष बुद्ध वंदना होणार आहे. त्यातही ते सहभागी होतील. यानंतर नागरिकांना मार्गदर्शनही करतील. १२.३५ वाजत ते हेलिकॉप्टरने नागपूरला परत येतील. राजभवन येथे ते भोजन करतील. थोडा वेळ आराम करतील. सायंकाळी ४ वाजता रेशीमबाग येथील मनपाच्या सुरेश भट सभागृहाचे उद्घाटन करतील. यानंतर ते थेट विमानतळावर जातील आणि तेथून दिल्लीला रवाना होतील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद २२ रोजी दीक्षाभूमीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:23 AM
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नियोजित नागपूर दौरा प्रशासनाकडे अजूनही अधिकृतपणे आलेला नाही.
ठळक मुद्देड्रॅगन पॅलेस विपश्यना सेंटर व सुरेश भट सभागृहाचे उद्घाटन