लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ मुख्यमार्गालगतच्या मॉडल मीलची अनेक वर्षापूर्वीची जीर्ण भिंत मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली तीन कार व दोन दुचाकी वाहने दबल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या धंतोली झोनचे सहायक अयुक्त ए.सी. काळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिसराची पाहणी करून प्रवर्तन विभागाच्या पथकाने भिंतीचा उर्वरित भाग पाडला.भिंत पडली तेव्हा घटनास्थळी जाकीर खान, शहबाज खान, पापा, साजिद आदी उपस्थित होते. भिंत पडणार असल्याची चाहूल लागताच दूर पळाल्याने बचावले. मलब्यात गॅरेजचे सामान दबले. भिंत पडल्याची चर्चा परिसरात पसरताच घटनास्थळी लोकांची गर्दी जमली होती. यामुळे या मार्मावरील वाहतूक बराचवेळ विस्कळीत झाली होती.मॉडल मील बंद पडली परंतु कर्मचाºयांची कॉलनी अजूनही कायम आहे. मॉडल मील चौक ते एसटीबस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील भिंत, कर्नलबाग झोपडपट्टीला लागून आहे. ही भिंत जीर्ण अवस्थेत आहे. मंगळवारी कोसळलेली भिंत मॉडल मील चाळीची आहे. ही चाळ कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका आहे. यामुळे जिवीत हानी होण्याचा धोका आहे.
नागपुरात मॉडल मीलची जीर्ण भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:48 PM
गणेशपेठ मुख्यमार्गालगतच्या मॉडल मीलची अनेक वर्षापूर्वीची जीर्ण भिंत मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास कोसळली. भिंतीच्या मलब्याखाली तीन कार व दोन दुचाकी वाहने दबल्याने वाहनांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या धंतोली झोनचे सहायक अयुक्त ए.सी. काळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. परिसराची पाहणी करून प्रवर्तन विभागाच्या पथकाने भिंतीचा उर्वरित भाग पाडला.
ठळक मुद्देपाच वाहनांचे नुकसान