नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर प्लॅटफाॅर्म क्रमांक ८ च्या बाजूला एका बंद पडलेल्या दाराच्या जवळ काही महिन्यापूर्वी स्वच्छतेसंबंधी संदेश लिहिला आहे. दरम्यान, या संदेशाच्या शेजारीच इतकी घाण पसरली आहे की तेथे उभे राहणेही कठीण होत आहे. येथे सार्वजनिक शौचालय नाही. शहरातील जुन्या वस्तीत आणि जुन्या बाजारात संत्रा मार्केटचा समावेश आहे. येथे फळ आणि पान मार्केट आहे. त्यामुळे येथे अस्थायी शौचालयाची गरज आहे. परंतु स्वच्छतेचा संदेश लिहिला तेथेच कचरा जमा करण्यात येतो. स्वच्छतेचा संदेश केवळ भिंतीवर लिहिलेला दिसतो. मेट्रोच्या पुलाच्या खाली घाण पसरली असून, येथील रस्ताही चुकीचा तयार केला आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत. यामुळे घाण, दुर्गंधीसोबत धूळ उडत असून मोकाट जनावरांची संख्या या भागात अधिक असल्यामुळे आणखीनच घाण साचत असल्याची स्थिती आहे.
................