शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

नागपुरात सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:52 AM

नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे रीडिंग ठप्प झाल्यामुळे मिळाले नाही क्रेडिट

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात हजारो घरांमध्ये सोलर रूफ टॉप लावण्यात आले आहेत. विजेचा खर्च कमी करण्यासाठी नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या छतावर सोलर रूफ लावले. परंतु एवढी गुंतवणूक करूनही त्यांना काहीच मिळाले नाही. लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.उल्लेखनीय म्हणजे सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांच्या घरात नेट मीटर लावण्यात येतात. त्यामुळे घरात येणाऱ्या पारंपरिक विजेची (इनपुट) आणि रूफ टॉपपासून उत्पन्न होणाऱ्या विजेची (आऊटपुट) माहिती होते. ३१ मार्चला वर्षभराचा हिशेब होतो. जर आऊटपुट अधिक असल्यास त्याची रक्कम ग्राहकांच्या खात्यात क्रेडिट करण्यात येते. परंतु यावर्षी असे झाले नाही. नागपूर शहरात रूफ टॉप लावणाऱ्यांची संख्या ३ हजार आहे. परंतु यातील बहुतांश नागरिकांचे रीडिंग घेण्यात आले नाही. जून महिन्यातही रीडिंग सुरू केल्यानंतर नेट मीटरिंगच्या ग्राहकांची मीटर रीडिंग शक्य झाली नाही. महावितरणचा दावा आहे की या वर्षी रूफ टॉपपासून उत्पादन होणाऱ्या विजेचे दर ठरलेले नाहीत. कोरोनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दर ठरल्यानंतर ग्राहकांना लाभ दिला जाऊ शकतो, असे महावितरणचे म्हणणे आहे.सवलतही विसरलेवर्ष २०१९-२०२० मध्ये सोलर रूफ टॉप लावणाऱ्यांना सवलत मिळाली नाही. २०२०-२१ मध्ये ही सवलत देण्यास सुरुवात झाली नाही. सन २०१८-१९ मध्ये ७७.२२ कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळाल्यानंतर आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत. मागील आर्थिक वर्षात एकूण १२३ कोटी रुपयांची सवलत अपेक्षित होती. सवलतीची जबाबदारी महाऊर्जापासून महावितरणला देण्यात आली आहे. परंतु महावितरणने त्यासाठी पोर्टलही तयार केले नाही. उल्लेखनीय म्हणजे सोलर रूफ टॉप लावणाºयांना ४० टक्के सवलत देण्याची तरतूद आहे.रीडिंग घेण्याचे निर्देशमहावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग अ‍ॅण्ड रेव्हेन्यू) योगेश गडकरी यांच्या मते, लॉकडाऊनमुळे बहुतांश ग्राहकांचे रीडिंग घेणे शक्य झाले नाही. आता प्रदेशातील सर्व विभागांना या महिन्यात रीडिंग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये रीडिंग घेण्याची परवानगी मागण्यात येईल. सोलर रूफ टॉपच्या ग्राहकांना पुढील बिलात लाभ देण्यात येईल.

 

टॅग्स :electricityवीज