लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सीजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे पथक तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.राजभवनाच्या बाजूला आयुष हॉस्पिटल मध्ये नुकतेच हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. सध्या येथे ४५ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दुपारी ४.३० च्या सुमारास ऑक्सिजनचा सर्वत्र गंध पसरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांत कुजबुज सुरू झाली. त्यानंतर काही रुग्णांना ऑक्सिजन सुरळीत मिळत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या ध्यानात आले. त्यामुळे येथे एकच धावपळ निर्माण झाली. ऑक्सीजन गळती सुरु झाल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पसरली. त्यामुळे ती प्रशासनाच्या कानावरही गेली. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची दुरुस्ती करणारे तज्ज्ञांचे एक पथक, अग्निशमन दल तसेच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला ऑक्सीजन सिलेंडर मधील मुख्य कॉक बिघडल्याने वायुगळती सुरू झाल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच या बिघाडाची दुरुस्ती केली आणि ऑक्सीजन प्रणाली सुरळीत केली. खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमधील सर्व सिलेंडरची तपासणी करून ते व्यवस्थित आहेत की नाही, त्याचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तास दुरुस्ती करणारे पथक रुग्णालयातच थांबले. सर्व काही व्यवस्थित असल्याचे ध्यानात आल्यामुळे या पथकाने रुग्णालयातून सोडले. नाशिकची पुनरावृत्ती टळलीनाशिकच्या घटनेमुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. अशात ही घटना घडल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकच नव्हे तर रुग्णालय प्रशासनात आणि जिल्हा प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली होती. घटनास्थळावरून रुग्णांना हलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात ॲम्बुलन्सही बोलवण्यात आल्या होत्या. सुदैवाने नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली.
अनर्थ टळला; ... नाहीतर नागपूरचेही नाशिक झाले असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 7:17 PM
Coronavirus in Nagpur news; राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सीजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती.
ठळक मुद्देकोविड सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाडप्रशासनात प्रचंड खळबळ तातडीने केली दुरुस्ती