नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न : नागरिक सुरक्षा स्वयंसेवकांचे सादरीकरणनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे सुरक्षा विभागातर्फे ‘डीआरएम’ कार्यालय परिसरात विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डी. सी. अहिरवार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी अशोक मसराम, विभागातील शाखा आणि इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात ४० नागरिक सुरक्षा स्वयंसेवकांनी आणि १० भारत स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात सामान्य नागरिकांची सुरक्षा, नागरिक सुरक्षा संघटनेच्यावतीने कशाप्रकारे करण्यात येते हे प्रात्यक्षिकासह पटवून दिले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी उपस्थित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिक सुरक्षा संघटनेच्या कार्याबाबत मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी नागरिक सुरक्षा संघटनेला २० हजार रुपये तसेच भारत स्काऊट आणि गाईडला ५ हजार रुपयांचे पुरस्कार जाहीर केले. कार्यक्रमाला रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दपूम रेल्वेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक
By admin | Published: February 25, 2016 3:13 AM