लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात लोकसंख्येच्या आधारावर बाजारासाठी जागा उपलब्ध करणे अपेक्षित होते. आठवडी बाजार ही नागरिकांची गरजच आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन)अधिनियमानुसार फेरीवाल्यांना संरक्षण प्राप्त आहे. सोबतच बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली.गोकूळपेठ येथील बाजार ६० वर्षापूर्वीचा आहे. अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले. यामुळे बाजार बंद आहे. लोकांची गैरसोय होत आहे. सोबतच शेकडो लोकांचा रोजगार बुडाला आहे. शहरातील ६२ बाजारातही अशीच परिस्थिती आहे. विक्रे त्यांना बसण्यासाठी पट्टे आखून द्या, त्याबाहेर बसणाऱ्यांवर कारवाई करण्याला विरोध नाही. पण जे आखून दिलेल्या जागेवर व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई करू नका अशी सूचना गजभीये यांनी केली.शहरात हॉकर्स झोनची निर्मिती व शहर विकास आराखड्यानुसार आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून टाऊ न वेंडिंग कमिटी गठित क रणे आवश्यक आहे. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शहरातील फेरीवाले व भाजी विक्रे त्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. हजारो लोकापुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने आठवडी बाजार व फेरीवाल्यांच्या विरुद्ध सुरू केलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी प्रकाश गजभिये यांनी केली.
शिस्त लावा पण हॉकर्सचा रोजगार हिरावू नका : प्रकाश गजभिये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 10:40 PM
बाजारातील विक्रेत्यांना शिस्त लावण्याला कोणाचाही विरोध नाही. परंतु अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली त्यांचा रोजगार हिरावू नका, अशी भूमिका आमदार प्रकाश गजभिये यांनी बुधवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याची चर्चा करताना मांडली.
ठळक मुद्देअतिक्रमण कारवाईसंदर्भात मनपा आयुक्तांशी चर्चा