पीएम केअर फंडमधील रकमेची माहिती जाहीर करा; हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:20 PM2020-05-11T12:20:24+5:302020-05-11T12:21:59+5:30

पीएम केअर फंडमध्ये आतापर्यंत जमा झालेल्या रकमेची माहिती जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह अ­ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

Disclose the amount in the PM Care Fund; Petition in the High Court | पीएम केअर फंडमधील रकमेची माहिती जाहीर करा; हायकोर्टात याचिका

पीएम केअर फंडमधील रकमेची माहिती जाहीर करा; हायकोर्टात याचिका

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीएम केअर फंडमध्ये आतापर्यंत जमा झालेल्या रकमेची माहिती जाहीर करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह अ­ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

या फंडमध्ये देश-विदेशातील सामान्य व्यक्तीपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी आपापल्या शक्तीनुसार दान दिले आहे. टाटा समूहाने १५०० कोटी तर, अजीम प्रेमजी फाऊंडेशनने १२२५ कोटी रुपये दान केले आहेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटना, एशियन डेव्हलपमेंट बँक आदींनीही कोट्यवधी रुपये दिले आहेत. परंतु, फंडमध्ये आतापर्यंत किती रक्कम जमा झाली याची माहिती सरकारने जाहीर केली नाही. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची गरज आहे. तसेच, फंडमधील जमाखर्चाचे कॅगमार्फत आॅडिट केले गेले पाहिजे. तसे न केल्यास या घटनात्मक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.


विश्वस्तांची पदे तातडीने भरा
पंतप्रधान हे या फंडचे अध्यक्ष तर, केंद्रीय संरक्षण मंत्री, गृहमंत्री व वित्तमंत्री विश्वस्त आहेत. याशिवाय ट्रस्टच्या घटनेनुसार, तीन विश्वस्त आरोग्य, विज्ञान, विधी, कॉर्पोरेट इत्यादी प्रमुख क्षेत्रांमधून अनुभव व पात्रता निकषांच्या पूर्ततेनंतर भरायचे होते. परंतु, एक महिन्यावर कालावधी संपूनही या नियुक्त्या झाल्या नाहीत. जनहित लक्षात घेता यासंदर्भात तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच, तीनपैकी दोन विश्वस्त देशातील प्रमुख विरोधी पक्षांमधून नियुक्त करावेत असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

 

Web Title: Disclose the amount in the PM Care Fund; Petition in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.