शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

व्यापाऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Published: January 09, 2015 12:49 AM

नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत.

वाद नायलॉन मांजाच्या बंदीचा : प्रशासन आतापर्यंत झोपले होते का ?नागपूर : नायलॉन मांजाबाबत काही वर्षांपासून वाद सुरू आहे. संक्रांत आली की नायलॉन मांजावर बंदी घातली जाते. नायलॉन मांजा घातक आहे बाब मान्य आहे. परंतु त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता आम्ही मांजा विक्रेत्यांनी ८ डिसेंबर रोजी पोलीस विभाग व मनपा आयुक्तांना एक निवेदन सादर केले होते. त्यात आम्ही स्पष्टपणे विचारणा केली होती की, नायलॉन मांजावर बंदी घालण्याबाबत प्रशासनाचा काही विचार आहे का?, बंदी घालायचीच असेल तर आताच सांगण्यात यावे, असेही सुचविण्यात आले होते. परंतु तेव्हा प्रशासनाकडून काहीही कळविण्यात आले नाही. तसेच यासंबंधात आम्ही यापूर्वी न्यायालयात सुद्धा गेलो आहोत. न्यायालयाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला होता. आता मकरसंक्रांतीचा सण जवळ आला आहे. व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा माल घेऊन ठेवला आहे. त्याचे काय करायचे. बंदी घालायचीच होती तर अगोदरच घालायला हवी होती. ही बंदी केवळ व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारे असून अन्यायकारक आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाचा अवमान करणारी सुद्धा आहे, असे मत नायलॉन मांजाचे ठोक विक्रेते राकेश शाहू यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी) उत्पादनावरच बंदी का नाही नायलॉन मांजा हा घातक आहे, ही बाब मान्य आहे. परंतु केवळ विक्री आणि उडवण्यावर बंदी घालून ठोस काहीही साध्य होणार नाही. बंदी घालायचीच होती तर अगोदर घालायला हवी होती. आम्ही तो माल खरेदी करूनच ठेवला नसता. लाखो रुपयांचा माल सध्या पडून आहे. त्यामुळे आमचे नुकसान झालेच आहे. दरवर्षी केवळ सणाच्या दिवशी बंदी घालून काहीही होणार नाही. बंदी घालायचीच असेल तर नायलॉन मांजाच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात यावी. - सुनील शाहू , नायलॉन मांजा विक्रेता आमची काय चूक आम्ही विक्रेते आहोत. नायलॉन मांजाला चायनीज मांजा सुद्धा म्हटले जाते. परंतु आम्ही हा माल काही चायनामधून आणत नाही. आपल्याच देशात हा मांजा तयार होतो. बंगळुरु येथून आम्ही तो आणतो. लोकांना स्वस्त पडतो म्हणून त्याची मागणी आहे. आम्ही व्यवसाय करणारे आहोत. ज्याची मागणी असेल तो माल आम्ही विकणार यात आमची काय चूक आहे. नायलॉनसोबतच पारंपरिक मांजाही आम्ही ठेवतो, लोक जे मागतील ते आम्ही विकू.-विक्रांत शाहू, मांजा विक्रेता