कार्यालय दोन दिवस प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात : मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यानागपूर : मुख्यमंत्री आणि एमएडीसीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि उपाध्यक्ष व एमडी विश्वास पाटील यांच्याशी चर्चेच्या लेखी आश्वासनानंतर शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी रात्री १० वाजता ठिय्या आंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातील वरिष्ठ उपजिल्हाधिकारी जयश्री कटरे यांनी दुपारी नागपूर गाठून प्रकल्पग्रस्तांशी प्रदीर्घ चर्चा केली. १९ मार्चला दुपारी १ वाजता विश्वास पाटील प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करतील, तर मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यात पहिली बैठक प्रकल्पग्रस्तांसोबत घेणार असल्याचे लेखी आश्वासन कटरे यांनी दिले. त्यानंतरच जवळपास ५० महिला आणि पुरुषांनी एमएडीसीच्या मध्यवर्ती इमारतीतील मुख्य सल्लागार चहांदे यांच्या ताब्यातील कार्यालय सोडले.प्रकल्पग्रस्तांशी थेट भेटसदर प्रतिनिधीने दुपारी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. एमएडीसीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी होते. पूर्वीचा अनुभव पाहता यावेळी शासनाच्या फसव्या घोषणांना शेतकरी फसणार नाही. पूर्वी दोन तारखा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या नाही. यावेळीही हीच स्थिती आहे. शासन आणि पोलिसांच्या दंडुकेशाहीसमोर नमते घेणार नाही, असे मत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांमध्ये सर्वाधिक महिलाआंदोलनकर्त्यांमध्ये ३० पेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहेत. त्यात ७५ वर्षे वयस्क महिलेचा समावेश आहे. शासनाने आम्हाला देशोधडीला लावल्याचा आरोप या महिलेने केला. आंदोलनकर्त्या महिलांमध्ये प्रामुख्याने कमला गिऱ्हे, मीरा राऊळ, लक्ष्मी ताजने, ताई ठाकरे, शेवंता हिवराळे, नलिनी आंभोरे, पुष्पांजली डवरे, गीता तायवाडे, विजया वैद्य, रेखा डवरे, शोभा आंभोरे, शोभा मानकर, निशा चौधरी, पुष्पा खोब्रागडे, पुष्पा भोयर, सुशीला हिवराळे, प्रमिला इंगोले, चंद्रकला भोयर यांच्यासह रवी गुडधे, रमेश सुरणकर, रंगराव ठाकरे, उमाकांत बोडे यांचा सहभाग होता. पोलिसांची दडपशाहीयापूर्वी हक्कासाठी केलेल्या आंदोलनात पोलिसांनी डोक्यावर लाठ्यांनी प्रहार केल्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे यावेळचे आंदोलन अहिंसेने आणि गांधीगिरीने सुरू आहे. पण बुधवारी आंदोलनात पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब करीत आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसांनी महिलांना मारहाणीचा प्रयत्न करून कार्यालयातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस निरीक्षक जगताप यांनी ‘तुमचे आंदोलन खतम करू’ अशी धमकी दिली. इमारतीबाहेर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी गाडीत बसवून धमकाविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. इमारतीच्या मुख्य गेटमधून प्रकल्पग्रस्त कार्यालयात येऊ नये म्हणून गेटवर ३० ते ४० पोलिसांचा ताफा लावला होता. कार्यालयातील वीज बंद केलीमुख्य सल्लागार चहांदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये बहुतांश महिला होत्या. त्यानंतरही या इमारतीतील वीज रात्री १०.३० च्या सुमारास जाणीवपूर्वक बंद केली. कार्यालयात काळोख तर रस्त्यावर उजेड होता. शासनाच्या अशा कृतीला आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे
By admin | Published: March 18, 2016 3:12 AM