माैदा : तालुक्याच्या ग्रामीण भागातील काेराेनाचे वाढते संक्रमण राेखण्यासाठी माैदा येथील एनटीपीसी औष्णिक वीज प्रकल्प प्रशासनाच्या वतीने खंडाळा, धामणगाव, आजनगाव यासह अन्य गावांचे नुकतेच निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी गरजूंना मास्क व वैद्यकीय साधनांचे वाटपही करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी एमटीपीसी प्रशासनाच्या वतीने माैदा शहराचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील काही गावांचे निर्जंतुकीकरण करायला सुरुवात केली. साेबतच नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, यासाठी जनजागृतीही केली जात आहे. या सर्व बाबी सामाजिक दायित्वातून प्रतिबंधात्मक उपाययाेजना म्हणून केल्या जात असल्याचेही एनटीपीसी प्रशासनाने स्पष्ट केले. एनटीपीसी कर्मचारी संस्था व एनटीपीसी समृद्धी महिला क्लबच्या वतीने गरजूंना उपचारासाठी आर्थिक मदत केली जात आहे.