लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेत मागील १५ वर्षांपासून मनमानी कारभार सुरू आहे. नियमाबाह्य घरबांधणी कर्ज वाटप, पाचपावली शाखेकरिता जागा खरेदी, संगणक खरेदी व स्थायी नियुक्ती आदी प्रकरणात अनियमितता झाली असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बँकेच्या १५० हून अधिक सभासदांनी केली आहे. याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी ३० सप्टेंबरला याबाबत सुनावणी ठेवली आहे.गत काळात सभासदांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली. परंतु चौकशी अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक बाबी नमूद करून चौकशी थंडबस्त्यात टाकली. यामुळे अनियमितता करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू आहे. कर्ज वाटपात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू आहे. नियमबाह्य नोकर भरती करून संचालकांच्या नातेवाईकांना लावण्यात आले. ज्यांना संगणक हाताळता येत नाही, असे संगणक परीक्षेत टॉपर होते. गैरप्रकार करून संचालकांच्या नात्यातील १७ उमेदवारांची निवड करण्यात आली. अनियमित कारभारामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी बँकेचे सभासद प्रविड तंत्रपाळे, रंजन नलोडे, बाबा श्रीखंडे, हेमराज शिंदेकर, कुणाल मोटघरे, बळीराम शेंडे, पुरुषोत्तम कैकाडे यांच्यासह अन्य सदस्यांनी केली आहे. याची दखल घेत ३० सप्टेंबरला उपनिबंधकांनी सुनावणी ठेवली आहे. सुनावणीमुळे संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.संचालकाचा कालावधी आधीच संपलाबँकेच्या संचालक मंडळाचा कालावधी ३ मे २०२० रोजीच संपला आहे. शासनाने कोविड-१९ मुळे मुदतवाढ दिली आहे. या वाढीव मुदतीत संचालक मंडळ आपल्या हिताचे निर्णय घेत असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.
मनपा कर्मचारी बँक बरखास्त करा : सदस्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 8:54 PM
नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेत मागील १५ वर्षांपासून मनमानी कारभार सुरू आहे. नियमाबाह्य घरबांधणी कर्ज वाटप, पाचपावली शाखेकरिता जागा खरेदी, संगणक खरेदी व स्थायी नियुक्ती आदी प्रकरणात अनियमितता झाली असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बँकेच्या १५० हून अधिक सभासदांनी केली आहे.
ठळक मुद्दे३० सप्टेंबरला उपनिबंधकांकडे सुनावणी