सावनेर : शहरातील दिवाणी व फाैजदारी न्यायालयात शनिवारी (दि. २५) लाेकन्यायालयाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात १,१३२ विविध प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या लाेकन्यायालयात २,८७९ न्यायप्रविष्ट प्रकरणे निर्णयाधीन ठेवण्यात आली होती. यात २,७४० प्रकरणे पूर्ववादस्वरूपाची, १२५ प्रकरणे फौजदारी, तर १४ प्रकरणे दिवाणी स्वरूपाची हाेती. ही प्रकरणे आपसी सामंजस्याने सोडवण्यावर भर देण्यात आला. न्यायाधीश जे.एस. कोकाटे यांनी लाेकन्यायालयाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी न्यायाधीश जे.एस. कोकाटे, न्यायाधीश डी.आर. कुलकर्णी, न्यायाधीश नातू, ॲड. शैलेश जैन, ॲड. मुलमुले, ॲड. मनोज खंगारे, ॲड. गुडधे, ॲड. भोजराज सोनकुसरे, ॲड. चंद्रकांत पिसे, ॲड. चंद्रकांत सरोदे, ॲड. प्रशांत माहेश्वरी, ॲड. सदाशिव गायधने, ॲड. विजय मेटकर यांच्यासह बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, युनियन बँक, पतसंस्था, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.