लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिर २५ जानेवारीपर्यंत सुरू राहील.शिबिरात प्रलंबित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निपटारा करण्यात येत आहे. मनपाचे अधिकारी आणि सीए ए.एस. कुळकर्णी प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करीत आहेत. तसेच स्टील हार्डवेअर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सहसचिव उमेश पटेल, स्वप्नील अहिरकर, शब्बार शाकिर, सूर्यकांत अग्रवाल, वीरेंद्र चांडक, सीए गिरीश मुंदडा, सीए रितेश मेहता, शंकर सुगंध, नारायण तोष्णिवाल, मोहन चोईथानी, अॅड. निखिल अग्रवाल व्यापाऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
नागपुरात २५० कोटींच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:36 PM
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
ठळक मुद्देएनव्हीसीसीमध्ये निवारण शिबिर : व्यापाऱ्यांचे सहकार्य