लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी प्रदीप लेहगावकर हा आरटीओ कार्यालय येथे प्रणाली प्रशासक (संगणक) या पदावर कार्यरत आहे. त्याने लोकसेवक पदाचा गैरवापर करून अपसंपदा जमविल्याच्या अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागला प्राप्त झाल्या होत्या. वाढत्या तक्रारी लक्षात घेता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या स्तरावर गुप्त चौकशी सुरू केली. या चौकशीत लेहगावकर हा २१ मे १९९२ रोजी नोकरीवर लागल्यापासून ते ९ आॅगस्ट २०१२ या कालावधीत त्याने मिळविलेल्या एकूण संपत्तीपैकी १८.१७ टक्के संपत्ती जास्त कमावल्याचे आढळून आले. चार लाख ७० हजार ८७४ रुपये (१८.१७ टक्के) इतक्या किमतीच्या संपत्तीचा हिशेब तो देऊ शकला नाही. त्यामुळे ही संपत्ती त्याने भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे आढळून आले. त्यानुसार बुधवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या घराची झडती घेण्यात आली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम, शुभांगी देशमुख, पोलीस हवालदार सुनील कळंबे, दिनेश शिवले, पोलीस शिपाई मंगेश कळंबे, दीप्ती मोटघरे, मंजुषा बुंदाले, चालक शिशुपाल वानखेडे यांनी केली.
नागपूर आरटीओतील कर्मचाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 10:28 PM
प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देगैरमार्गाने जमविली अपसंपदालाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई