शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

नागपुरात गुंडांचा वाद, एकाची निर्घृण हत्या : पाच आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:05 PM

दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देहुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन गुंडांमध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. पंकज नारायणरावजी कोंडलकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. 

पंकज एका लोहा कंपनीत काम करीत होता. तो गुन्हेगारी वृत्तीचा होता. तो श्रीरामनगरातील पराते पेट्रोल पंपामागे राहणाऱ्या नितीन लाकडे यांच्याकडे भाड्याने राहायचा. पंकजने २०११ मध्ये नंदनवनमध्ये एकाची हत्या केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तो लोहा कंपनीत काम करायचा. त्याचे विशाल तुमडे (वय २४, रा. गारगोटी, नरसाळा) नामक गुंडासोबत वैर होते. एक महिन्यापूर्वी त्यांच्यात कडाक्याचा वाद आणि हाणामारीही झाली होती. या वादात विशालचा मित्र नितीन टुले (वय ४९, रा. पवनपुत्रनगर, नागपूर) याने उडी घेतली. तेव्हापासून वाद तीव्र झाले. दोघेही एकमेकांना संपवण्याची धमकी देत होते. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास आरोपी विशाल, नितीन टुले, गोलू ऊर्फ काल्या कोहळे (वय ३०, रा. गारगोटी), आकाश मोरे (वय २३, रा. तुलाजीनगर) आणि अमित पाल (वय २५, रा. पवनपुत्रनगर) हे पंकजच्या रूमवर आले. त्यावेळी पंकज दारू पीत होता. आरोपींसोबत बाचाबाची झाली आणि आरोपी विशाल तसेच साथीदारांनी पंकजवर घातक शस्त्राचे सपासप घाव घालून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून घरमालक नितीन लाकडे धावले. पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. आरोपी शिवीगाळ आरडाओरड करीत होते. आरोपी पळून गेल्यानंतर नितीन रंगनाथ लाकडे (वय ३०) याने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी पंकजला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन लाकडेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मंगळवारी सर्वच्या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीया निर्घृण हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे. पोलिसांनी पंकजच्या रुमची झडती घेतली असता त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. गुंडांमधील वैमनस्यातूनच हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार विशाल तुमडे असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तुमडे तसेच नितीन टुले हे दोघेही कुख्यात गुन्हेगार आहेत. तुमडेविरुद्ध घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत तर, टुले याने २०१५ मध्ये एकाची हत्या केली होती. त्याचा हत्येचा हा दुसरा गुन्हा आहे. अन्य आरोपींचा गुन्हेगारी अहवाल तपासला जात असल्याची माहिती ठाणेदार संदीप भोसले यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर