शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आमदार निधीवरून काँग्रेस- राष्ट्रवादीत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 8:32 PM

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती कुंभारे यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण टाळण्यासाठी आमदारांनी दिलेल्या निधीच्या खर्चावरून काँग्रेस व राष्ट्रवादीतच कलगीतुरा रंगला आहे. निधी खर्चच झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सलील देशमुख यांनी केला होता. तर देशमुखांच्या आरोपात कुठलेही तथ्य नसल्याचे आरोग्य सभापती कुंभारे यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या नियंत्रणाकरिता मास्क, थर्मल स्क्रीनिंग व इतर साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून २० लाखांची तरतूद करण्यात आली. जिल्ह्यातील सहा आमदारांनी प्रत्येकी २० लाख रुपये यासाठी दिले होते. एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खर्च झाला नाही, उपाययोजनात्मक साहित्य ग्रामीण भागात पोहचलेच नाही. या निधीचे काय झाले? कोणते साहित्य खरेदी केले? याबाबतचे प्रश्न सलील देशमुख यांनी सभागृहात उपस्थित केले होते. ही बाब उपाध्यक्ष व आरोग्य सभापतींच्या चांगल्याच जिव्हारी लागली. त्यांनी याबाबत आढावा घेतला असता, देशमुखांनी केलेले आरोप माहिती न घेता केल्याचे निदर्शनास आले.कुंभारे म्हणाले, तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व आमदारांना आरोग्यसंदर्भातील खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तेव्हा तीन आमदारांनी १० लाख रुपयांचा जिल्हा नियोजन समितीचा हक्काचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे दिले. त्यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल, नरखेडसाठी, आमदार टेकचंद सावरकर यांनी मौदा, कामठी व नागपूर ग्रामीणसाठी तर आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या हिंगणा विधानसभा मतदार संघासाठी निधी दिला. त्यानंतर सदरचा निधी जिल्हा प्रशासनाच्या बीडीएसवर आला. जि.प.ने जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर निधीतून साहित्य खरेदीचा प्रस्ताव १३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकाºयांकडेच हा प्रस्ताव रखडला आहे. त्यामुळे साहित्याची खरेदीच झाली नाही.सेसफंडातून ५८ लाखाची तरतूदकुंभारे म्हणाले, जिल्हास्तरावर सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट, थर्मल स्क्रीनिंग मशीन आदी साहित्य खरेदीकरिता सर्वप्रथम पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा खनिज निधीतून २० लक्षाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून काही साहित्याची खरेदी झाली. तर उर्वरित खरेदी सुरू आहे. तर जि.प.च्या सेसफंडात करण्यात आलेल्या ५८ लाखाच्या तरतुदीमधून ५ लक्ष रुपयातून इन्फ्रारेड थर्मामीटरची खरेदी करून ते जि.प.च्या अखत्यारित प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रा(पीएचसी)ला उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर उर्वरित निधीतून औषध व इतर साहित्य खरेदीबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.दोन आमदारांचे योगदान नाहीगृहमंत्री अनिल देशमुख, आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर यांनी निधी दिला. उमरेड व रामटेक या विधानसभा क्षेत्रातील आमदारांकडून निधी उपलब्ध झाला नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसfundsनिधी